Monday, September 28, 2009
मरण
मृत्युत आहे एक अद्भुत शक्ती.
मरण हे सत्य अंतिम आहे ह्या जगती,
तरीही मरण का इतके हे मन हेलावती,
कोणाचाही मृत्यु असो का हळहळ वाटावी इतकी ती.
आयुष्यभराचा अबोला, वैर क्षणात उडूनी जाती,
धाय मोकलून मन रडू लागते एक जणू ते अपराधी,
दबलेली भावना मग आपली लागते मुक्त वाहू ती.
जन्मानंतर असतो जो फक्त काही मोजक्यांचा,
मृत्युनंतर होऊन जातो तोच साऱ्या जगाचा,
रंक असो वा राव असो होऊन जाई एक पातळी ती.
अनैसर्गिक घटना जितकी सुन्न करी माणसा तितकी ती,
परिपूर्ण काही कधीच नसते जाणारी ती ही व्यक्ती,
कळे न काही का फक्त तयाची सत्कार्येच ही आठवती,
खरा अर्थ कळतो कुठे जगण्याचा मानवाला
त्यामुळेच कदाचित वाटतो देवदूत मृत्यु तयाला,
देण्या तो सज्ज होई आतुरतेने मग ही आहुती.
लढता देशासाठी यावा मृत्यु यासम दुसरे भाग्य नसे,
वाटते अशावेळी आपुल्या जगण्याला काही अर्थ नव्हे,
क्षणात बलीदान तयांचे गाठते ऊंची ती किती.
आयुष्यभर गुणांची जयाच्या कदर कोणा नसे,
वणवण, कुचंबणा फक्त सोसली तयाने असे,
कवटाळताच मृत्युने कळते खरी तयाची ही महती.
मृत्युत सारे जणू मोक्ष एक ते शोधती,
वाटते मरण तयांना देवाच्या घरची पायरी ती,
अनंतात विलीन होण्या हसत मृत्युला ते कवटाळती.
कुणी न काही कल्पिले कधी,
मृत्युत आहे एक अद्भुत शक्ती.
....................................आशिष जोशी
चाकोरी-बाहेरचे जीवन
प्राजक्ताचा पडला सडा,
पापण्यातील साखरझोप सारून तर बघा,
श्वास भरभरून तो सुवास घेऊन तर बघा.
श्रावणातली एक प्रसन्न सकाळ,
सभोवार पसरली दूरवर हिरवळ,
मस्त पडलेल्या धुक्यामध्ये जाऊन तर बघा,
अनवाणी पायाने दवबिंदूंवर चालून तर बघा.
उन्हाळ्यातल्या कडक दुपारी,
नभ अचानक येते भरूनी,
‘येरे येरे पावसा’ साद घालून तर बघा,
वळीवाच्या सरींत भिजत नाचून तर बघा.
हिवाळ्यातले शुभ्र चांदणे,
गुलाबी थंडीत लपेटलेले,
शेकोटीची उब अंगावर घेऊन तर बघा,
मित्रांसोबत रात्रभर गप्पा मारून तर बघा.
दिवसाची सुरुवात आगळी,
सुवर्णप्रभा नवतेज झळाळी,
न ठरविता ऑफिसला दांडी मारून तर बघा,
फक्त दोघं राजा-राणी मजा करून तर बघा.
सुट़्टीत विसावा संथ पहुडलेला,
घरी मुलांचा खेळ रंगलेला,
मुलांबरोबर साप-शिडी, लपा-छपी खेळून तर बघा,
चिमुकल्या नजरेतून ओसंडणारा आनंद साठवून तर बघा.
आयुष्यात दडले विलक्षण रंग,
मनात उठती असंख्य तरंग,
एकदातरी सगळ्यांचा आस्वाद घेऊन तर बघा,
थोडं चाकोरीबाहेर जाऊन मुक्त जगून तर बघा.
...............................आशिष जोशी
तपोवन
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.
झाडी गर्द-हिरवी सभोवताली,
पाचूचे जणू वस्त्र ल्यायलेली,
अंधूक पायवाट आलो चालून एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.
मेघ सावळे आसमंती दाटलेले,
त्या ईश्वराने जणू छत्र धरलेले,
ओला गंध मातीचा आलो घेऊन एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.
पक्षांची हलकी ऐकली कूजबूज,
एकमेकांशी जणू चालले हितगूज,
केका मयुराचा आलो ऐकून एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.
वाऱ्याची मंद झुळुक येतसे,
मोरपिस जणू गालावर फिरतसे,
धुंद श्वास आलो घेऊन एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.
चोहीकडे अनेकविध रंग उधळले,
मोहक जणू इन्द्रधनू झळकले,
लाजऱ्या रानफुलाला आलो भेटून एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.
कालचे स्वप्न सत्यात आज आले,
रम्य तपोवनात आलो जाऊन एक मी.
............................आशिष जोशी
Monday, August 31, 2009
आयुष्याची वर्ष सरता-सरता वयाची चाळिशी गाठली जाते,
डोक्यामध्ये निर-निराळ्या प्रश्नांचे थैमान, विचार-मंथन सुरू होते,
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस||
आयुष्यात आपण काय कमावले, काय गमावले याची मोजदाद सुरू होते,
कमवल्याच्या आनंदापेक्षा, गमावलेल्याची हूर-हूर वाटत राहते,
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस||
भूतकाळातील घटनांचे संदर्भ बदलून गेल्याची जाणीव होते,
आता अवतीभवती घडणार्या घटनांचे नवे संदर्भ जाणण्याची उर्मी जागी होते,
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस||
शाळा-कॉलेज, लगेच मिळालेली नोकरी, पगारवाढ सगळे आठवत असते,
त्याचबरोबर हेही लक्षात येते की, आपण फक्त नोकरीच केली, करियर करायचे राहून गेले,
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस||
कामातील गती अचानक कमी झालेली वाटते,
काहींना ही दगदग, धावपळ मुद्दाम कमी करावीशी वाटते,
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस||
आजवर करीत आलेल्या गोष्टीविषयी आत्मीयता संपत जाते,
न केलेल्या गोष्टी करण्याविषयी सुप्त आसक्ती वाढत जाते,
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस||
हेवे दावे, लोभ मत्सर, आपल-परक सगळ्या भावना धूसर होतात,
जगण्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन, नव्या संवेदना प्रकट होत जातात,
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस||
एकेकाळचे जिवलग मित्र, सवंगडी यांची सारखी आठवण होते,
हेही कळते की, मधल्या काळात सख्ख्या जोडीदाराकडे दुर्लक्ष झाले होते,
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस||
आपण मिळविलेले यश, कीर्ती यांचे महत्व गौण वाटू लागते,
आता आपल्या मुलांनी खूप यश मिळवावे हीच उत्कट ईच्छा लागून राहते,
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस||
अशा ह्या नैसर्गिक वळणावर सगळेच येऊन धडपडत असतात,
काय होईल, कस होईल ह्याचा विचार करत आपापली वाट शोधत असतात||
अशाच एका वळणावर येऊन मीही अडखळ लो आहे,
माझ्या आयुष्याला निराळी दिशा देणारी वाट मला भेटेल का हे शोधतो आहे||
आयुष्यात असे महत्वाचे बदल आणणार्या वळणाला क्रायसिस हे नाव ठीक नसेल,
परंतु आणखीन पुढे एक 'मिड-लाइफ' अजुन बाकी आहे हा दिलासा मात्रा नक्कीच सुखावेल||
......................................................................................आशिष जोशी
Thursday, August 20, 2009
Back to Basics!!
Newspapers filled with stories of bloodbath abound,
You feel helpless seeing people turning into cynics,
You know that now it’s time to go back to basics.
When you see the craze for materialism increasing,
billboards for newer and newer products flashing,
You feel sad seeing people dump things you love, as relics,
You know that now it’s time to go back to basics.
When you hear the hapless poor pleading,
People turning into silent spectators, leaving the victims bleeding,
You feel distressed watching endless debates and all become just critics,
You know that now it’s time to go back to basics.
When you realize that people are missing the virtue of sympathy,
Everyone running the rat race devoid of any empathy,
You feel appalled as people now have become nothing but egocentrics,
You know that now it’s time to go back to basics.
When you observe the blind acceptance to all things western,
People denouncing their culture embracing everything modern,
You feel agitated with people turning into nothing but hypocrites,
You know that now it’s time to go back to basics.
When you notice people losing interest in things simple and pure,
There is growing focus on quantity and no sign of cure,
You feel disappointed hearing loud noise and crave for soothing lyrics,
You know that now it’s time to go back to basics.
Tuesday, January 20, 2009
New Year Resolutions!
New Year, New Resolutions!! No that’s old saying, isn’t it?New Year to me means new beginnings, starting things afresh, wiping out the slate clean, forgetting the past, looking forward to the future, making new friends, breaking new grounds, analyzing one’s past mistakes and learning to make best from these in future. It also means unlocking your mind, overcoming your mental obstacles, trying to do the unthinkable.
It’s almost like getting a new car to drive every year! All the problems of your old, over-used car going away and you are getting a brand new one to drive, to explore things unexplored so far, visiting new destinations, soaking up the smell of that new upholstery and so on..Wouldn’t it be great if life too can be just like this? Most of you would say, ‘no it can’t be’. Really so? I think it can still be, if you look at it from such a broader view point. How is it possible? It’s no rocket science!! In my opinion, even a small effort in taking stock of your life’s goals (if you have already defined them) or even sitting down to list these down if you haven’t started yet, is all that is required to start with. Find out where you stand with respect to these goals, don’t sulk about the things you didn’t or couldn’t do last year. And then plan for taking action/s in the New Year.
New Year, New Year, Oh, you are already here,
What will I do this year, I am not so sure!
Will it be just like last year, or will be any different?
Leave all such thoughts behind, because only you can make the difference!
Look at it like it’s completely a new beginning,
Starting afresh, let’s give life altogether a new meaning!
It’s time to look ahead and plan for what’s going to be on your plate,
And it’s time to forget the past mistakes and wipe out clean your slate!
It’s time to meet new people and make new friends,
It’s also the time to explore and break new grounds!
Look at your long term goals and take charge of your life,
Plan now and bring the balance back in your life!